हे प्रेतांचे कारखाने थांबवा!
माणूस भोवतालचे जग बदलू शकतो, घडवू शकतो अन् या व्यवहारातूनच स्वतःलाही घडवत जातो. ही माणसाची व्याख्या मानली तर शिक्षणाने माणूस हा माणूस होतो. प्राण्यांच्या पिल्लांना न शिकविता ती अन्न मिळवू शकतात, मोठी होऊ शकतात. पण माणसासारखे जगणे मुळातच शक्य करायला शिक्षण आवश्यक आहे. समाजात वाढताना अनेक मार्गांनी हे शिक्षण आपण शोषत असतो, पण शाळा कॉलेजातल्या …